अजब शक्कल ! चोरट्यांनी ‘या’ बँकेचे एटीएम मशीनच पळवलं

0
269

शिक्रापूर, दि.२६ (पीसीबी) : स्टेट बँक ऑफ इंडियाचे संपूर्ण एटीएम मशीनच शिक्रापूर येथील पाबळ चौकातून तीन चोरट्यानी चोरून नेले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास 25 डिसेंबरच्या हा प्रकार घडला. या एटीएम मशीनमध्ये रोख 19 लाख 50 हजार रुपये होते. शिक्रापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूरातील पाबळ रोडवर स्टेट बँकेचे हे एटीएम सेंटर होते. 25 डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतीन तीन चोरटे आले. त्यांनी एटीएम मशीनभोवती दोर गुंडाळला आणि स्कॉर्पिओ गाडीने ओढून संपूर्ण मशीन चोरून नेले. याप्रकरणी स्टेट बँकेचे कर्मचारी इराप्पा चंदापा इरेकरी (वय 31) यांनी तक्रार दिली असून तीन अज्ञात चोरट्यांविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.