Pimpri

अजबच! सोन्यासोबत चोरून नेले कपडे आणि स्पोर्टशूज सुद्धा?

By PCB Author

July 28, 2021

सांगवी, दि. २८ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथे दोन चोरट्यांनी घरफोडी करून 75 हजार रुपयांचे वेस्टर्न कपडे, स्पोर्टशूज, सोन्याची चैन, कानातले सोन्याचे टॉप्स चोरून नेले. ही घटना एप्रिल ते मे 2021 या कालावधीत कुणाल आयकॉन सोसायटी, पिंपळे सौदागर येथे घडली.

समीरन पात्रा (रा. हडपसर, पुणे), दिनेश (रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सोनिया विक्रमसिंग रावत (वय 35, रा. कुणाल आयकॉन सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी मंगळवारी (दि. 27) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनिया रावत कुणाल आयकॉन सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर राहतात. एप्रिल 2021 मध्ये फिर्यादी त्यांच्या मूळ गावी देहरादून उत्तराखंड येथे गेल्या. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या फ्लॅटच्या चाव्या आरोपींना दिल्या. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी फिर्यादी यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. फ्लॅटमधून वेस्टर्न कपडे, स्पोर्टशूज, सोन्याची चैन, कानातले सोन्याचे टॉप्स असा एकूण 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी त्यांच्या गावाहून परत आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबाबत पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.