Entertainment

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील ‘या’ कलाकाराला झाली कोरोनाची लागण; मालिकेची शूटिंग लगोलग थांबवली

By PCB Author

September 23, 2020

मुंबई,दि.२३(पीसीबी) : झीमराठी वरची आवडती मालिका ‘अग्गंबाई सासूबाई’ ची शूटिंग तूर्तास थांबवली आहे. कारण मालिकेत बबड्याची आई म्हणजेच आसावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोणतीच लक्षणं जाणवत नसल्याने सध्या त्यांना घरीच आयसोलेट करण्यात आलं आहे. निवेदिता यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली आहे.

दरम्यान ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत भूमिका साकारणाऱ्या इतर कलाकारांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक या सर्वांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आले आहेत. १५ सप्टेंबरपासून मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली आहे. मात्र पुढील दोन दिवसांत शूटिंगला सुरुवात होईल. निवेदिता सराफ क्वारंटाइनमधून बाहेर आल्यानंतर शूटिंगसाठी उपस्थित राहतील. मालिकेच्या सेटवरील सर्वांच्या सुरक्षेची योग्यरित्या काळजी घेतली जात असल्याचं मालिकेच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं.