काँग्रेसला धक्का; अखेर सुजय विखे-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
490

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र सुजय विखे-पाटील यांनी आज (मंगळवार)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन  आदी नेते उपस्थित होते.  नगर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी तयार नाही. त्यामुळे  सुजय यांनी भाजपप्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, सुजय यांच्या भाजप प्रवेशाला विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी विरोध केला होता. दिलीप गांधी आता काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार आहेत, असे सांगितले जात आहे.