अखेर राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेला हिरवा कंदील

0
428

मुंबई, दि. २१ (पीसीबी) –  मुंबईतील राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी देण्यात आली आहे. येत्या २३ एप्रिल रोजी राज ठाकरेंची काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात सभा होणार आहे. मनसेने २४ एप्रिलला सभेची परवानगी मागितली होती, मात्र मनसेला एक दिवस आधी २३ एप्रिलची परवानगी मिळाली आहे.

निवडणुकीच्या काळात सभेच्या परवानगीसाठी असलेली ‘एक खिडकी यंत्रणा’ आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून परवानगीसाठी टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप मनसेने केला होता. १८ तारखेला राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीसाठी प्रयत्न केला असता मनसेचा कोणताही उमेदवार निवडणुकीला उभा नाही.

त्यामुळे  महापालिकेकडून परवानगी घ्यावी, असे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्ही परवानगी देऊ शकत नाही, असे सांगून परत पाठवले होते, असे मनसे नेते संजय नाईक यांनी  सांगितले.