अखेर मुहूर्त ठरला! काँग्रेसमधील बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची चिन्हे

0
362

मुंबई, दि.२१ (पीसीबी) –   विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होणार आहे. बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची चिन्हं आहेत. ‘सिटिंग गेटिंग’ या तत्त्वानुसार काँग्रेस विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देणार आहे.

आज ४० ते ५० जणांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती छानणी समितीचे सदस्य विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

आज जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, रमेश बागवे, प्रणिती शिंदे यांची नावं निश्चित मानली जात आहे.

पहिल्या यादीत काँग्रेसच्या काही विद्यमान आमदारांसह काही माजी आमदारांचीही नावे आहेत. आज पहिली यादी जाहीर झाल्यानंतर २६ तारखेला काँग्रेसची दुसरी यादी होणार आहे.