अखेर मनसेचा झेंडा बदलला

0
422

मुंबई, दि.२३ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मनसेचं महाअधिवेशन आज पार पडत असून राज ठाकरे यांनी यावेळी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केले. मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचे अनावरण केले.

राज ठाकरे यांनी झेंड्याचं अनवारण करण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. तसंच आपण संध्याकाळी भाषण करणार असून त्यात सविस्तर बोलणार असल्याची माहिती दिली.