Maharashtra

अखेर भारतात पहिल्यांदाच धावली ‘शेषनाग’

By PCB Author

July 03, 2020

छत्तीसगड दि.३ (पीसीबी) : आपण जास्तीत जास्त 30 ते 40 डब्यांची मालगाडी धावलेली पाहिली असेल. मात्र भारतीय रेल्वेने तब्बल 2.8 किमी लांबीची आणि 251 डबे असलेली एक ट्रेन चालवण्याचा विक्रम केला आहे. या विशेष मालगाडीला ‘शेषनाग’ असे नाव देण्यात आले होते.

या विशेष मालगाडीला सुपर पायथन ‘शेषनाग’ असे नाव देण्यात आले होते. ही ट्रेन छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या दोन स्टेशन दरम्यान धावली. परमलकसा आणि दुर्ग हे दोन्ही स्टेशन रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य झोनच्या नागपूर विभागात येत असले तरी छत्तीसगडमधील स्टेशन्स आहेत. यासाठी रेल्वेने चार मालगाड्या एकत्र जोडल्या होत्या. भविष्यात अशी मालगाडी एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री, अन्न धान्य, युद्ध जन्य परिस्थितीत आवश्यक साहित्य पोहोचवण्यासाठी रेल्वे काय करू शकते याची चाचणी झाली आहे.

परमलकसा ते दुर्ग दरम्यानचे अंतर हे 22 किलोमीटरचे आहे. मालगाडीने ते 45 मिनिटात पूर्ण केले. परमलकसा येथून ही ट्रेन काल दुपारी 12.20 मिनिटांनी सोडण्यात आली व ती 1.05 मिनिटांनी दुर्गला पोहोचली. ही मालगाडी दुर्गहून पुढे बिलासपूर आणि तेथून कोरबापर्यंत ही गेली. एकूण 251 डबे, व्हॅगन, 4 ब्रेक व्हॅन आणि 9 विद्युत इंजिन या खास ट्रेनला जोडण्यात आले होते. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच चार मालगाड्यांना जोडून एवढी लांब मालगाडी तयार करत ती चालवण्यात आली आहे.

‘शेषनाग’ चा धावतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय.

#Breaking शेषनाग ऑन ट्रैक. बड़ी सफलता देश की सबसे लंबी माल गाड़ी दौड़ी पटरी पर…कितनी बड़ी? खुद ही देख लीजिए।
4 rakes, 251 wagons,
2.8 km long
Running between
Nagpur to KORBA
Longest train of india. #sheshnaag @PiyushGoyal @RailMinIndia 🙌👌 pic.twitter.com/VTJdEfT5ZE

— 🇮🇳DeLtA FoRcE-!🇮🇳 (@M16BpIa81St4N) July 2, 2020