Maharashtra

अखेर नारायण राणे दोन पुत्रासह भाजपमध्ये डेरेदाखल

By PCB Author

October 15, 2019

कणकवली, दि. १५ (पीसीबी) – अखेर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी आज (मंगळवार) कणकवलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. 

कणकवलीतून नितेश राणे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आज त्यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप प्रवेशानंतर नारायण राणे म्हणाले की, या दिवसाची मी फार दिवस वाट पाहात होतो.  माझ्यासह निलेश राणे, नितेश राणे यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला,  असे मी जाहीर करतो.

मुंबईत हा प्रवेश करायचा नाही, तर कणकवलीत हा प्रवेश सोहळा होईल, असे मी सांगितले होते. त्याप्रमाणे आज ही प्रवेश प्रक्रिया पार पडली. मी आमदार असताना नारायण राणे विरोधी पक्ष नेते होते. त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळाले, यापुढेही त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल, यात काहीही शंका नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.