Desh

अखेर नवज्योत सिंग सिद्धू वर्षभराची शिक्षा भोगण्यासाठी कोठडीत

By PCB Author

May 20, 2022

चंदिगड, दि. २० (पीसीबी) – पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना गुरुवारी (ता. १९) सर्वोच्च न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धूला एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी (ता. २०) पटियाला जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली. १९८८ च्या या खटल्यात नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. सिद्धूला आत्मसमर्पण करण्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा वेळ हवा असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार होते. मात्र, सिद्धूंनी शुक्रवारी दुपारी दिल्लीच्या पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले.

वकिलाने सिद्धू यांना आत्मसमर्पण करण्यासाठी चार ते सहा आठवडे वाढवण्याच्या विनंतीला विरोध केला होता. ३४ वर्षे झाले म्हणजे गुन्हा मरतो असे होत नाही. आता निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा ३ ते ४ आठवड्यांची आवश्यकता आहे. मात्र, वेळ देण्याबाबत विचार करणे हा न्यायालयाचा अधिकार आहे, असे पंजाबच्या वकिलांनी सांगितले. न्यायमूर्ती खानविलकर यांनी सिद्धूच्या वकिलाला अर्ज दाखल करण्यास सांगितले आणि खंडपीठाच्या स्थापनेसाठी सीजेआयसमोर नमूद केले.