अखेर त्याच्याकडून जप्त केला तब्बल ४२ हजारांचा गांजा

0
172

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून 42 हजार 900 रुपये किमतीचा एक किलो 716 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी (दि. 20) भाटनगर येथे केली.

प्रशांत विजय तामचीकर (वय 46), अशोक दगडू सकट (वय 45, दोघेही रा. भाटनगर, पिंपरी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्याकडे गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून दोघा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून 42 हजार 900 रुपये किमतीचा एक किलो 716 ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहे.