अखेर एकनाथ खडसेंना राष्ट्रीय कार्यकारणीतही संधी नाहीच

0
273

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) : भाजप राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर झाली आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नव्या टीमची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. मात्र ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना या कार्यकारिणीतही स्थान मिळालेलं नाही. राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत भाजपने खासदार हिना गावित यांना स्थान दिलं आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 12 उपाध्यक्ष, महामंत्री 8, संघटन महामंत्री 1 , सहसंघटन महामंत्री 3 असा समावेश आहे. महाराष्ट्रातून माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे तसेच विजया रहाटकर ,सुनील देवधर, खासदार हिना गावित यांचा समावेश कऱण्यात आला आहे. विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावर महामंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, परंतु सर्वात जेष्ठ अशा खडसे यांना डावलण्यात आले.