अखेर आशिष देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश  

509

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – नागपुराच्या काटोलचे भाजपमधील नाराज आमदार आशिष देशमुख यांनी अखेर आज (बुधवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला . नवी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थित आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आशिष देशमुख यांनी २ ऑक्टोबर रोजी  भाजपसह आपल्या आमदारीकाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी वर्ध्यात राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते  काँग्रेसमध्ये  प्रवेश करणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. आता त्यांनी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये अधिकृत पक्ष प्रवेश केला आहे.

आशिष देशमुख हे नागपूरमधील काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. उच्चशिक्षित असलेल्या आशिष देशमुखांनी ‘ग्रामविकासाचा पासवर्ड’ पुस्तकही लिहिले आहे. इंडस्ट्रियल स्पेशलायझेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि फायनान्समध्ये एमबीए आणि पीएचडी असे उच्चशिक्षण घेतलेले  आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले काका राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला होता.