अखेरच्या टी-२० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; मालिका १-१ बरोबरीत

0
663

सिडनी, दि. २५ (पीसीबी) – ऑस्ट्रेलियाविरूध्दातील टी-२०  मालिकेतील तिसरा सामना भारताने ६ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.  या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. कृणाल पंड्याची भेदक गोलंदाजी आणि विराट, धवनची आक्रमक खेऴीच्या बळावर भारताने ६ गडी राखत  हा सामना खिशात घातला.

भारताने या सामन्यातील विजयबरोबर मालिकेतही बरोबरी साधली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदांनी टेचून मारा केला. कृणाल पंड्याच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कृणाल पांड्याने सामन्यात ४ फलंदाजांना तंबुत माघारी धाडले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारताला १६४ धावांवर रोखण्यात यश आले.

विराटने सामन्यात नाबाद ६१ धावांची खेळी केली. १६५ धावांचे आव्हान भारताने सलामीवीर शिखर धवन – रोहित शर्माची अर्धशतकी भागीदारी आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केले. दिनेश कार्तिकने विराटला पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचायला मदत करत विजयावर शिक्कामोर्तब केला.