Notifications

अक्षय कुमार, दीपिका पाडुकोण आणि आलिया भट्ट मतदान करू शकत नाहीत

By PCB Author

April 15, 2019

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देशवासीयांनी अधिकाधिक मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देताना दिसत आहेत. परंतु, बॉलिवूडमधील काही बडे कलाकार दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदान करू शकणार नाहीत. त्यामध्ये सबसे बडा खिलाडी अक्षय कुमार, आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांचा प्रामुख्याने समावेश आहे.