Maharashtra

अकोल्यात ईव्हीएमला विरोध करून मतदाराने मशीन फोडले

By PCB Author

April 18, 2019

बाळापूर, दि. १८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रात १० जागांसाठी आज (गुरूवार) मतदान सुरु झाले आहे. अकोला जिल्ह्यातील कवठा गावातील एका मतदाराने मतदान केंद्रावरील ईव्हीएम फोडल्याची घटना समोर आली आहे.  ईव्हीएमला विरोध असल्याचा दावा या मतदाराने केला आहे.

श्रीकृष्ण घ्यारे  असे मशीन फोडणाऱ्या मतदाराचे  नाव  आहे. त्याला  पोलिसांनी  अटक केली आहे.

विदर्भातील ३, मराठवाड्यातील ६ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर अशा महाराष्ट्रातील एकूण १० जागांसाठी मतदान होत आहे. आपला  ईव्हीएमला विरोध आहे, असे सांगून श्रीकृष्ण यांने मशीनची तोडफोड केल्याचा दावा  केला आहे. या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ  श्रीकृष्ण घ्यारे याला अटक केली आहे.