अंबाती रायडूचा निवृत्तीचा निर्णय मागे

0
370

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – विश्वचषक  स्पर्धेसाठी  भारतीय संघात निवड न केल्याने नाराज झालेल्या भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडूने ३ जुलैरोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. पण आता रायडुने आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.

एका इंग्रजी संकेतस्थळाशी बोलताना  रायुडू म्हणाला की, मी चेन्नईच्या संघाकडून आयपीएलमध्ये  खेळत राहणार आहे. तसेच भारताकडून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासही आपण तयार  आहे. त्यासाठी  लवकरच पुनरागमन करेन. सध्या मी शाररिक तंदुरुस्तीवर भर देतो आहे. चेन्नईचा संघ हा मला नेहमी आपल्या घरच्यासारखा वाटतो.

दरम्यान, सुरुवातीचे काही हंगाम मुंबई इंडियन्सकडून खेळणारा अंबाती रायुडू गेली काही दोन वर्ष चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत आहे.  त्यामुळे अंबाती रायुडू याचे पुनरागमन  आयपीएलच्या २०२० च्या हंगामातून होणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.