अंबरनाथमध्ये रामदास आठवलेंच्या कानशिलात लगावली; तरूणाला बेदम मारहाण

0
3084

कल्याण, दि. ९ (पीसीबी)  – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथमध्ये धक्काबुक्की  करून कानशिलात लगावल्याचा प्रकार  शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ येथे घडला. त्यानंतर आठवले यांच्या  समर्थकांनी  धक्काबुक्की करणाऱ्याला बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

रामदास आठवले अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताना  प्रविण गोसावी या तरुणाने आठवलेंना धक्काबुक्की करत कानशिलात लगावली. त्यानंतर आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रविणला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पक्षाच्या त्यांनी आठवलेंना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध केला आहे.

प्रविण आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असून तो काही काळ आरपीआयचा सक्रीय कार्यकर्ता होता, असे सांगितले जात आहे. प्रविण आठवलेंविरोधात सोशल मीडियावरहरी लिहीत होता.  दरम्यान प्रविण शुद्धीवर आल्यानंतरच त्याने आठवलेंना धक्काबुक्की का केली याचा उलगडा  होऊ शकतो.