Pimpri

अंगाला हळद लागण्या आधीच इंजिनियर तरुणीचा अपघाती मृत्यू

By PCB Author

December 10, 2020

वाघोली, दि.१० (पीसीबी) : मोठ्या कष्टाने प्रतिकूल परिस्थितीत तिने शिक्षण घेत आपलं इंजिनियरिंग पूर्ण केलं होत. नामांकित कंपनी मध्ये तिला नौकरी हि लागली होती होती. लग्न जमलं,जोडीदारही तीला इंजिनियरच मिळाला होता.परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत.

प्रणाली संदीप शिंदे (रा. आंबेगाव) या तरुणीच्या बाबतीत नियतीने क्रूर डाव खेळाला. अंगाला हळद लागण्या आगोदरच तिचा अपघाती मृत्यू झालाय. त्यामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या प्रणाली ने प्रतिकूल परिस्थिती मध्ये शिक्षण घेतले होते. इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला ६ महिन्यांपूर्वी वाघोली मधील एका नामांकित कंपनी मध्ये नौकरी देखील लागली होती. तसेच लवकर तिला प्रमोशन देखील मिळणार होते. दोन महिन्यांपूर्वी इंजिनियर तरुणा सोबत तिचा विवाह देखील ठरला होता. काही दिवसांवर लग्न आलेलं असताना तिचा दुर्दैवी असा अंत झाला.

३ डिसेंबर रोजी संध्याकाळी कंपनी मधून रिक्षाने रूमवर जात असताना ती बसलेल्या रिक्षाचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये तिच्या डोक्याला जबर मार बसला. तिला तातडीने तिच्या मित्रमैत्रिणीने दवाखान्यात हलवलं. तब्बल ३ दिवसाच्या झुंजेनंतर अखेर तिची प्राणज्योत मावळली.. तिच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर, मित्र मैत्रिणीवर आणि गावावर शोककळा पसरली आहे…