Videsh

अंकिता रैना दुहेरीच्या अंतिम फेरीत

By PCB Author

December 12, 2020

दुबई, दि. ११ (पीसीबी) : भारताच्या अंकिता रैना हिने आपली जॉर्जियाची साथीदार एकटेरिना गॉर्गोझे यांनी येथे सुरू असलेल्या एक लाख डॉलर्स पारितोषिकाच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

उपांत्य फेरीच्या लढतीत अंकिता आणि एकटेरिना यांनी रशियाच्या ब्लिन्कोवा अॅना आणि ब्रिटनच्या हेदर वॅटसन या जोडीचा रंगतदार लढतीत ६-७ (१-७), ६-३, १०-२ असा विजय मिळविला. ही लढत १ तास ३३ मिनिटे चालली.

विजेतेपदाच्या लढतीत आता त्यांची गाठ बोल्सोवा झॅडोइनोव-कायाजुवान जोडीशी पडणार आहे. त्यांनी डाल्मा गाल्फी आणि तेरेझा मिहालिकोवा जोडीचा ७-६ (७-२), ६-३ असा पराभव केला.