९०च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींच्या निधनाच्या अफवांना सोशल मीडियावर उधाण

46

अमेरिका, दि.०४ (पीसीबी) : अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांनी ९०च्या दशकात बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर त्यांनी जादू करत प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री मिनाक्षी यांचे करोनामुळे निधन झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या पाहून मिनाक्षी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या गार्डनमध्ये बसल्याचे दिसत आहे. दरम्यान त्यांनी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘डान्स पोज’ असे कॅप्शन दिले आहे.

मिनाक्षी या अमेरिकेतील टेक्सास शहरात आपल्या पती हरीश मैसूर आणि दोन मुलांसोबत राहतात. मिनाक्षी यांनी १९८३ साली निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा तेव्हाचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता.

WhatsAppShare