७२ हे लग्नाचे योग्य वय आहे- सलमान खान

108

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – अभिनेता सलमान खान याने अद्याप लग्न केलेले नाही. त्याच्या लग्नाची चर्चा सुरू होऊन आता बंद देखील झाली तरीही त्याच्या लग्नाचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. लग्नासाठीचे योग्य वय काय याचा खुलासा खुद्द सलमान खाननेच केला आहे. ७२ हे लग्नाचे योग्य वय आहे असे सलमान खानने म्हटले आहे. सलमान खानचा भारत हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत या सिनेमाने १५० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानला हा प्रश्न विचारण्यात आला की तुझ्या लग्नाची चर्चा सुरू होऊन बंदही झाली. त्यावर उत्तर देताना सलमानने लग्नासाठीचे योग्य वय ७२ असल्याचे म्हटले आहे.

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर ही सलमान खानची ख्याती आहे. मैनै प्यार किया या सिनेमापासून आत्ताच्या भारतपर्यंत आलेल्या सिनेमांचा विचार केला तर त्याची कारकीर्द बरीच मोठी आहे. एवढेच नाही तर त्याच्या गर्लफ्रेंड्सची यादीही बरीच मोठी आहे. तरीही सलमानने लग्न केलेले नाही. भारत सिनेमात सलमान खानने ७० वर्षांच्या वृद्धाची व्यक्तीरेखा साकारली आहे. या भूमिकेबाबत बोलतानाच सलमानने लग्नासाठीचे योग्य वय ७२ असल्याचे उत्तर दिले आहे.