५८ मोर्चे काढूनही भावना समजल्या नाहीत; शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले!

144

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – मराठा समाजाने ५८ मोर्चे शांततेत काढले तरी मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळल्या नाहीत, अशा बैठकीत जाऊन आम्ही काय वेगळे सांगणार, असे म्हणत शाहू महाराजांनी सरकारला धारेवर धरले.

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन बैठक बोलावली होती, या बैठकीला त्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना बोलवले होते, मात्र या बैठकीकडे शाहू महाराजांनी पाठ फिरवली.

मराठा आरक्षणाचा तगादा लावून धरलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाने हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवऱ मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. दरम्यान, आता बैठक नको, तर आरक्षण मिळाले पाहिजे, असा पवित्रा शाहू महाराजांनी यावेळी घेतला.