५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं; अभिनेता रितेश देशमुखने नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली

80

लातूर, दि. १५ (पीसीबी) – मोदींच्या ५६ इंच छातीची जाहीरपणे खिल्ली उडवत अभिनेता रितेश देशमुख याने लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेतलीय. ‘५६ इंचाची छाती म्हणजे केवढी मोठी छाती असणार असा विचार मी करत होतो, अहो, ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं’ असं म्हणत रितेशनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. लातूर येथील काँग्रेस मेळाव्यात तो बोलत होता. भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही काँग्रेसची देणगी आहे, हे लक्षात ठेवा असं म्हणत त्यानं स्वातंत्र्य संग्रामातील काँग्रेसच्या योगदानाचीदेखील आठवण करून दिली. शिवाय, देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही चांगले हृदय लागते, चांगले मन लागते असेही रितेश म्हणाला.