४१ लाख ५१ हजार महिलांना मोफत घरगुती गॅसजोडणी; किमया फडणवीस सरकारच्या ‘3D’ मॉडेलची !

117

मुंबई, दि, १८ (पीसीबी) – निवडणुकीच्या तोंडावर भरघोस आश्वासने दिली जातात, पण एकादा निवडणुक संपली की, सत्ताधाऱ्याना आपल्या आश्वसनाचा विसर पडतोय, परंतू देवेंद्र फडणवीस सरकारने आपण केल्या आश्वसनांची पूर्तता करत शेवटच्या माणसला लाभ मिळून देण्याचे काम केले. यापूर्वी कुठलीही सरकारी योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत अंमलबजावणी नीट न झाल्याने पूर्णपणे यशस्वी होत नव्हती. नेमका हाच मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घेऊन योजनांची अंमलबजावणी शंभर टक्के व्हावी याकरिता नियोजन केले. प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर महाराष्ट्रातील चाळीस लाख कुटुंबांनी धूरमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

महिलांच्या आरोग्याची निगा राखणे आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत देशभरात सात कोटी मोफत घरगुती गॅसजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या अंतर्गत महाराष्ट्रात ४१ लाख ५१ हजार ९९७ महिलांना मोफत घरगुती गॅसजोडणी दिल्या गेल्या आहेत. (सदरची आकडेवारी १६ जुलै २०१९ पर्यंतची आहे.)  म्हणजेच महाराष्ट्रातील जवळ जवळ ४० लाखांहून अधिक कुटुंबांना धूरमुक्त करण्यात फडणसवीस सरकार यशस्वी झाले आहे.

तसेच राज्यशास्त्र व अर्थशास्त्रातील जाणकार मंडळी #Devendra Development Doctrine  या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या कामगिरीचे वर्णन करत आहेत. सध्या देवेंद्रजींच्या या आगळ्या-वेगळ्या ‘3D’ मॉडेलची सर्वत्र चर्चा आहे.