३४ वर्षात कधीही भानगडी केल्या नाहीत – जयंत पाटील

338

इस्लामपूर, दि. १२ (पीसीबी) – राजकीय कारकिर्दीच्या ३४ वर्षात कधीही भानगडी केलेल्या नाहीत. त्यामुळे आयुष्यात रात्री शांत न झोप लागण्याची वेळ एकदाही माझ्यावर आलेली  नाही. जे काही केले ते स्वच्छ व पारदर्शी राजकारण केले आहे. निवडणुकीत मला पैसे खर्च करावे लागत नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.   

एका कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, तरूणांनी राजकारणात प्रवेश करताना पूर्ण विचार करायला पाहिजे. तरूणांनी सुरूवातीला समाजकारण करून लोकांची मने जिंकायला हवीत. पूर्ण वेळ राजकारण करणे, हा देशाला लागलेला रोग आहे. पाश्‍चात्य देशात उदरनिर्वाहासाठी उद्योग-व्यवसाय, नोकरी केली जाते. मात्र, आपल्याकडे याविरोधात आहे, असे ते म्हणाले.

याआधी लोकसभा राष्ट्रीय प्रश्नावर, विधानसभा राज्याच्या प्रश्नांवर लढविल्या जात होत्या. मात्र, सध्या राज्याचे, देशाचे काहीही होवो, माझ्या दारातील गटाराचे काय झाले? यामध्ये अधिक रस घेतला जातो, असे ते म्हणाले.