२ हजारांचा धनादेश पाठवून तरूणांनी केला सुजय विखेंचा निषेध

311

अहमदनगर, दि. ७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले २ हजार रुपये शेतकऱ्यांना चालतात, मग भाजपचे कमळ का नको ?, असे विधान करणारे भाजपचे खासदार सुजय विखे यांना नगरमधील शेतकऱ्यांच्या मुलांनी २ हजार रुपयांचा धनादेश स्पीड पोस्टाद्वारे पाठवला आहे. तसेच त्यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

खासदार  विखे यांच्या  विधानाचा निषेध म्हणून काही तरुणांनी त्यांना २ हजार रुपयांचा चेक पाठवला आहे. त्याचबरोबर एक जाहीर निवेदनही काढले आहे.  आम्ही सुजय विखे यांना २ हजार रुपये पाठवत आहोत. त्यांनी लोणीमध्ये कमळ सोडून अन्य कुणालाही मत द्यावे, असे आवाहन या निवेदनातून करण्यात आले आहे.

दरम्यान, पालकमंत्र्यांनी विरोधी उमेदवाराच्या सभेला जाणाऱ्या लोकांची यादी काढावी. त्या सभेला जाणाऱ्या अनेकांच्या खात्यात मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको?, तुम्हाला कम‌ळ चालत नसेल तर ते पैसे परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी तरी वापरता येतील,  असे  सुजय विखे यांनी एका सभेत  म्हटले होते.

 

WhatsAppShare