२ जुलै पासून ठाणे शहर १० दिवस पूर्णतः बंद

51

ठाणे, दि. २९ (पीसीबी) : महाराष्ट्र मिशन बिगीन अगेन अंतर्गतचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे राज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत. तर दुसरीकडे नवी मुंबई पाठोपाठ आता ठाणे शहरात येत्या 2 जुलैपासून पुढील 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. ठाणे शहर पोलिसांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

ठाण्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला कोरोना व्हायरसला प्रतिबंध घेण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिका आणि ठाणे पोलीस प्रशासनाने एकत्रित बैठक घेत शहरात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या कडक लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. मुंबई शहरात रुग्णांची संख्या आटोक्यात आली असताना आता नवी मुंबई आणि ठाणे शहरातील संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती आहे.

WhatsAppShare