२८ वर्षांनंतर ‘ये काली काली आंखे’ या प्रसिद्ध गाण्याबद्दल शिल्पा शेट्टीने केला खुलासा; म्हणाली, मला…

59

मुंबई, दि.१७ (पीसीबी) : ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ म्हणजे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही परीक्षक म्हणून काम करताना दिसतेय. या शोच्या आगामी भागामध्ये शिल्पा जुन्या आठवणींना उजाळा देणार आहे. ती अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि तिचा १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजीगर’ चित्रपटाविषयी बोलताना दिसणार आहे. ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या आगमी भागाध्ये कुमार सानू हे पाहुणे म्हणून येणार आहेत. त्यावेळी स्पर्धक नीरजा आणि भावना ‘बाजीगर’ चित्रपटातील हिट गाणे ‘ये काली काली आंखे’वर डान्स करताना दिसणार आहे. या दोन स्पर्धकांचा परफॉर्मन्स पाहून जवळपास २८ वर्षांनंतर शिल्पाने खंत व्यक्त केली आहे. तिला या गाण्यात सहभागी व्हायचे होते. ‘बाजीगर’ या चित्रपटातील ‘ये काली-काली आंखे’ हे गाणे हिट ठरले होते. या गाण्यात शाहरुख आणि काजोल दिसले होते.

या शोमध्ये शिल्पा म्हणाली कि, ‘ये काली काली आंखे गाण्यावर काजोल आणि शाहरुखचा डान्स पाहून माझा जळफळाट व्हायचा. कारण हे गाणे मला कारायचे होते. या गाण्यावर मला डान्स करायचा होता. कोरिओग्राफर आणि शोची परीक्षक गीता पाहुणे कुमार सानू यांना स्टेजवर शिल्पासोबत डान्स करण्यास सांगते. यावेळी तिने हा किस्सा सांगितलं. ‘ये काली काली आंखे’ हे गाणे अनु मलिकने कंपोज केले होते, या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी थोडे भांडण झाले होते. पण हे गाणे हिट ठरले होते असे कुमार सानू यांनी म्हटले आहे.

WhatsAppShare