२४ कोटींच्या विम्यासाठी त्याने केला ‘हा’ प्रताप

95

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – हंगेरी देशामधील एका व्यक्तीला विम्याची रक्कम मिळवण्यासाठी केलेल्या एका अजब कृत्यासंदर्भात दोषी ठरवण्यात आलं आहे. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी आरोपीने स्वत:चेच दोन्ही पाय कापल्याची माहिती समोर आली आहे. २.४ मिलियन पौंड म्हणजेच २४ कोटी रुपयांची विम्याची रक्कम मिळवण्यासाठी या व्यक्तीने स्वत:चे दोन्ही पाय ट्रेन अपघातात गमावल्याचा बनाव केला. यासाठी त्याने खरोखरच आयुष्यभरासाठी अपंगत्व स्वीकरलं पण नंतर हा बनाव उघड झाला अन् विम्याची रक्कम मिळण्याऐवजी आता त्याला शिक्षा सुनावण्यात आलीय.

विमा कंपनीने या दाव्यासंदर्भात शंका आल्याने न्यायालयात खटला दाखल केला. यावेळी कंपनीने विम्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने मुद्दाम ट्रेनच्या ट्रॅकवर आपले पाय गमावल्याचा आरोप कंपनीने केला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेला निकाल कंपनीच्या बाजूने लागला. २०१४ साली घडलेल्या या घटनेनंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात विम्याचे पैसे मिळतील अशी या आरोपीची अपेक्षा असल्यानं त्याने हे कृत्य केल्याचं न्यायालयाने मान्य केलं, असं ब्लिक नावाच्या वृत्तपत्राने म्हटलंय.