२० वर्षांच्या प्रेयसीस १९ वर्षांच्या प्रियकरासोबत लिव्ह-इनमध्ये राहण्यास परवानगी

650

अहमदाबाद, दि. ४ (पीसीबी) –  गुजरात उच्च न्यायालयाने सुरेंद्रनगरच्या एका २० वर्षीय युवतीस तिच्या प्रियकरासोबत राहण्यास परवानगी दिली आहे. युवतीचा प्रियकर १९ वर्षांचा आहे त्यामुळे दोघे लग्न करू शकत नव्हते. मात्र, युवती सज्ञान आहे त्यामुळे तिला हवे असल्यास कुणासोबतही राहू शकते. युवतीने आईसोबत राहण्यास नकार दिला होता.

राज्य सरकारने न्यायालयाला विश्वास दिला की, तरुणीला जिथे राहावे वाटेल तिथपर्यंत पोलिस घेऊन जातील, असा विश्वास राज्य सरकारने न्यायालयाला दिला. तरुणीच्या प्रियकराने न्यायालयात याचिका दाखल करून लिव्ह-इन रिलेशनशिपचा प्रस्ताव सादर केला होता. प्रेयसीला न्यायालयात हजर करण्याची मागणी त्याने केली होती.वय कमी असल्यामुळे लग्न करू शकत नाही. त्यामुळे दोघांनी लिव्ह-इन करारावर स्वाक्षरी केली आहे. दोघे भिन्न जातीचे होते. दोघांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या कुटुंबाने दोघांना शोधून काढले. न्या. एस.आर. ब्रह्मभट्ट व ए.जी. उरेजी यांच्या पीठाने त्यांच्यासमोर निर्णय घेत मुलीला प्रियकरासोबत राहण्याची परवानगी दिली.