२०२१ चे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांची एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलला भेट

438

पुणे, दि.१३ (पीसीबी) : ऑक्टोबर २०२१ रोजी सुवर्णपदक विजेता गोल्डन आर्म निरज चोप्रा यांनी चिंचवडच्या एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलला भेट दिली . नीरज चोप्रा हे भारताचे पहिले ट्रॅक अँड फील्ड ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आहेत. यावेळी एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल चिंचवड ने मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी संचालीक-प्राचार्या डॉ.अमृता वोहरा यांनी युवा चॅम्पियनचा निरज यांचा सत्कार केला आणि त्यांचे शाळेमध्ये स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला, प्रत्येकाला त्यांच्या शौर्यपूर्ण कामगीरीचे कौतुक होते, मंचावरच्या त्यांच्या उपस्थितीने शाळेचे सभागृह खर्या अर्थाने जिवंत झाले होते.

“नीरज चोप्रा यांनी या परस्परसंवादी कार्यक्रमात आपल्या सुवर्ण क्षणापासूनचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ खेळात प्राविण्य मिळवण्यासाठीच नव्हे तर नेहमी कृती आणि दृढनिश्चयाने निवडलेल्या मार्गाचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित केले. धैर्य आणि शिस्त हे यशासाठी दोन सर्वात महत्त्वाचे गुण आहेत, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “एखाद्याने नेहमी त्यांच्या हृदयाची हाक ऐकली पाहिजे आणि त्याचे पालन करणे महत्वाचे आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या खेळाची निवड करण्याची परवानगी दिली पाहिजे. ”

या उत्साहपूर्ण क्षणांच्या दरम्यान, निरज चोप्रा यांनी शाळेच्या क्रीडा क्षेत्रामध्ये प्रवेश केला. यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांच्या आजूबाजूला जल्लोष केल्याने, एका उल्लेखनीय क्षणी, त्यांनी आनंदाने भाला हातात घेतला आणि विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी एक अविश्वसनीय फेक दाखवली. त्याची ही कृती सहज होती ज्यामुळे त्यांनी सर्वच आश्चर्यचकीत केले. यानंतर त्यांनी भाल्यावर ऑटोग्राफ दिला आणि एल्प्रोचे स्पोर्ट कॅप्टन सुष्टीसिंह यांना तो भाला भेट दिला. सुर्ष्टीसिंह हे स्वतः राष्ट्रीय स्तराचे भालाफेक चॅम्पियन आहेत.

यावेळी एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या डॉ.अमृता वोहरा म्हणाल्या, “टोकियो ऑलिम्पिक २०२० चा विजयी भाला फेकणारे, नीरज चोप्रा यांनी संपूर्ण देशाच्या तरुणांवर खोल छाप सोडली आहे. माझ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एका तेजस्वी क्रीडा व्यक्तिमत्त्वासह थेट आणि परस्परसंवादी सत्र आयोजित करणे आणि त्यांना त्यांचा प्रवास, आव्हाने आणि यश सांगताना ऐकणे हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण होता. नीरजशी मनापासून झालेल्या संवादाने या सर्वांना प्रेरणा व अतुलनीय आनंद मिळाला. एल्प्रो येथे, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षी मनावर सकारात्मक परिणाम करण्याचे प्रयत्न करतो आणि त्यांना आवडीचे छंद जोपासण्यास वाव देतो. एल्प्रोला आशा आहे की नीरज चोप्राचा ऐतिहासिक ऑलिम्पिक विजय भविष्यातील पिढ्यांसाठी गौरवाचा मार्ग ठरवेल.