१७ व्या लोकसभेच्या ‘हंगामी अध्यक्षपदी’भाजपचे वीरेंद्र कुमार

85

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – भाजप खासदार डॅा. वीरेंद्र कुमार खटिक यांची १७ व्या लोकसभेचे  ‘हंगामी अध्यक्ष’ म्हणुन आज (मंगळवारी) निवड करण्यात आली आहे. वीरेंद्र कुमार हे मध्यप्रदेशमधील टीकमगढचे खासदार आहेत. आता ते सर्व खासदारांना शपथ देतील.

या अगोदर लोकसभा हंगामी अध्यक्ष पदासाठी बरेलीचे खासदार संतोष गंगवार व सुल्तानपुरच्या खासदार मेनका गांधी यांची नावे  चर्चेत होती. मात्र भाजप नेतृत्वाने ही दोन्ही नावांना बगल देत वीरेंद्र कुमार खटिक यांची वर्णी लावली आहे.