१०० कोटींची कमाई करण्यात ‘धडक’ यशस्वी

43

मुंबई, दि.१ (पीसीबी) – मराठीत सुपरहिट ठरलेल्या ‘सैराट’ चित्रपटाच्या रिमेकने म्हणजेच ‘धडक’ने अखेर जभरात १०० कोटींची यशस्वी कमाई केली आहे. ‘सैराट’ चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशामुळे साहजिकच ‘धडक’कडून प्रेक्षकांच्या खूपच अपेक्षा होत्या. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद लाभला, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ६३.३९ कोटींची कमाई केली तर भारतासह जगभरात या चित्रपटाला एकूण १०० कोटींचा गल्ला कमावण्यात यश आले आहे.

गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ८.७१ कोटींची कमाई केली. पहिल्या तीन दिवसांत ‘धडक’ने ३३ कोटी ७६ लाखांचा गल्ला जमवाला. नवोदित कलाकारांच्या चित्रपटाला लाभलेला हा सर्वाधिक प्रतिसाद होता. पहिल्या आठवड्यात यशस्वी कमाई केल्यानंतर ‘धडक’च्या कमाईचा वेग मंदावला होता. पण दोन आठवड्यात ‘धडक’ने ६३ कोटींची कमाई केली.

केवळ भारतात १०० कोटींची कमाई करणे ‘धडक’ला तरी सध्या अवघड दिसत आहे. या आठवड्यात ‘फन्ने खान’ प्रदर्शित होत आहे तर याच महिन्यात आणखी तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्यामुळे ‘धडक’ला नक्कीच या चित्रपटांचे मोठे आव्हान असणार आहे.