ह्दयद्रावक: गर्भवती महिलेचा गळा चिरुन निर्घृण खून

130

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – एका नवविवाहित गर्भवती महिलेचा गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१४) घाटकोपर परिसरातील नारायणनगर येथील रिक्षा स्टँडजवळून समोर आली.

मिनाक्षी चौरसिया (२०, रा. नारायण नगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणनगर परिसरातील एका ऑटो स्टँडजवळ रविवारी सकाळी मिनाक्षी यांचा मृतदेह एका ऑटोरिक्षा चालकाला दिसला. त्यानेच पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पीडित महिला गर्भवती होती तसेच तिचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आला होता. या प्रकरणी खुनाचा खटला दाखल करण्यात आला असून घाटकोपर पोलिस अधिक तपास करत आहेत.