होम थिएटरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने महिलेचा विनयभंग

50

तळेगाव दाभाडे, दि. २७ (पीसीबी) – होम थिएटरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या रागातून दोघांनी शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री साडेआठच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (दि. 26) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंदार क्षिरसागर, ग्यान प्रकाश सिंग यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मुलाने आरोपी मंदार क्षीरसागर याला होम थिएटरचा आवाज कमी करण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. टतुला काय करायचे आहे ते करट, असे आरोपी म्हणाले. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून आरोपींनी फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare