हॉर्न वाजवला म्हणून तरुणाला मारहाण करून लुटले

82

थेरगाव, दि. २२ (पीसीबी) – हॉर्न वाजविला म्हणून तिघांनी मिळून तरुणाला मारहाण करून लुटले. ही घटना 4 जून रोजी थेरगाव येथे घडली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटकही करण्यात आली आहे.

अक्षय चिमाजी ढवळे (वय 23, रा. कैलासनगर, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विकी मल आणि आकाश (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या इतर आरोपींची नावे आहेत. मयुर प्रकाश गिरी (वय 32, रा. काळाखडक, वाकड) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 21) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 4 जून रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास कैलासनगर, थेरगाव येथून चालले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या दुचाकीचा हॉर्न वाजविला. यामुळे आरोपींनी त्यांच्या गाडीला लाथ मारून खाली पाडले. आरोपी विकी मल यांनी फिर्यादी मयुर यांच्या डोक्‍यात बाटली मारून जखमी केले.

त्यानंतर आरोपींनी मयुर यांच्या खिशातील सहा हजार 200 रुपयांची रोकड व इतर कागदपत्र जबरदस्तीने काढून घेतली. तसेच मोबाइल रस्त्यावर आपटून नुकसान केले. आरोपी ढवळे याने मयुर यांच्या गाडीची चावी जबरदस्तीने काढून घेतली. मयुर यांनी बचावासाठी आरडा ओरडा केला असता काही नागरिक मदतीसाठी आले. मात्र त्यावेळी आरोपी विकी मल यांनी हातातील बाटली उंचावून मोठमोठ्याने ओरडून जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare