हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरली

39

उर्से, दि. ९ (पीसीबी) – उर्से टोलनाक्याजवळ एका हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 8) पहाटे साडेबारा ते सहा वाजताच्या कालावधीत घडली.

ज्योती विठ्ठल राठोड (वय 23, रा. ऊर्से, ता. मावळ) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / ए झेड 5916) उर्से टोलनाक्याजवळ श्री स्वामी समर्थ नावाच्या हॉटेल समोर मंगळवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पार्क केली. सकाळी सहा वाजता त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare