हॉटेल कॉर्नर व्हेज, नॉनव्हेज वर पोलिसांचा छापा; ४० हजारांच्या दारू सोबत ‘हे’ सुद्धा केले जप्त

1

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – अवैधरित्या हॉटेलमध्ये दारू विक्री करत असलेल्या एका हॉटेलवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. त्यात पोलिसांनी 40 हजार 101 रुपयांची देशी-विदेशी दारू आणि सोबतच ‘बिअरच्या बाटल्याही’ जप्त केल्या. ही कारवाई वराळे येथील हॉटेल कॉर्नर व्हेज नॉनव्हेज येथे करण्यात आली.

भूषण भरत बेल्हेकर (वय 38, रा. सुतार आळी, देहूगाव) याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार संदीप गवारी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बेल्हेकर याने त्याच्या वराळे येथील हॉटेल कॉर्नर व्हेज, नॉनव्हेज येथे अवैधरित्या, कोणताही परवाना न घेता दारू विक्री केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने हॉटेलवर छापा मारून हॉटेल चालक बेल्हेकर याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच हॉटेलमधून 40 हजार 101 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्या जप्त केल्या. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare