हॉटेलमध्ये नागरिकांची गर्दी केल्याने हॉटेल चालकावर गुन्हा..

106

हिंजवडी, दि. १७ (पीसीबी) – हॉटेलमध्ये गर्दी करून शासनाने दिलेल्या कोरोना बाबतच्या नियमांचा भंग करणाऱ्या हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 15) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मारुंजी रोड, हिंजवडी येथे करण्यात आली.

दीपक रामेश्वर त्रिवेदी (रा. देशी ढाबा, मारुंजी रोड, हिंजवडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई झनकसिंग गुमलाडू यांनी रविवारी (दि. 16) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक त्रिवेदी याचे मारुंजी रोड, हिंजवडी येथे देशी ढाबा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलची पोलिसांनी पाहणी केली असता आरोपीने तोंडाला मास्क लावला नव्हता. तसेच मानवी व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून हॉटेलमध्ये 30 ते 40 ग्राहकांना जमवून करोना नियमांचे उल्लंघन केले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवलदार एम पी शिंदे तपास करीत आहेत.