हॉटेलमधील नोकराकडून 96 हजारांचा अपहार

21

वाकड, दि. २६ (पीसीबी) – हॉटेलमध्ये काम करणा-या नोकराने 96 हजार 650 रुपयांचा मालकाच्या परस्पर अपहार केला. ही घटना 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2020 या कालावधीत रो एस आर रूम्स अंड हॉस्टेल्स, भूमकर चौक, वाकड येथे घडली.

राहुल दत्ता मिसाळ (वय 27, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या नोकराचे नाव आहे. याबाबत श्रीकांत दिगंबर कुलकर्णी (वय 65, रा. ब्रांदा, मुंबई) यांनी शनिवारी (दि. 24) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नोकर राहुल याने हॉटेल मधील ग्राहकांकडून गुगल पे द्वारे घेतलेले तसेच काउंटरमध्ये ठेवलेले 10 हजार रुपये, दोन जणांच्या पगाराचे चार हजार रुपये, गारबेज एजन्सी आणि गोदरेज लॉक वाल्याला देण्यासाठी ठेवलेले प्रत्येकी साडेतीन हजार असे एकूण 96 हजार 650 रुपये घेऊन आरोपी राहुल गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare