हैदराबादला कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या १४ उंटांची सुटका; एकाचा मृत्यू

282

औरंगाबाद, दि. ९ (पीसीबी) – उंटांची कत्तल करण्यासाठी घेऊन निघालेल्या एका ट्रक मधील तब्बल १४ उंटांची औरंगाबाद पोलिसांनी सुटका केली असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.८) उस्मानाबादजवळ करण्यात आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजस्थानहून आणलेले एकूण १४ उंट हैदराबादला कत्तलखान्यात नेण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळी औरंगाबाद पोलिसांनी सापळा रचून उस्मानाबादजवळ ट्रक अडवला आणि त्यातील १४ उंटांची सुटका केली. मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाला. सध्या उटांना गायींसाठी तयार करण्यात आलेल्या निवाऱ्यामध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिस अधिक तपास करत आहेत.