“हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला”- प्रवीण तरडे

233

हैदराबाद, दि.६ (पीसीबी) –  हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सगळेजण प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पोलिसांनी आरोपींना तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेलं असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केले आहे. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करत आहेत तर काहीजण चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मराठी अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला”, अशी पोस्ट करत प्रवीण तरडे यांनी पोलीस चकमकीचं समर्थन केले आहे.

हैद्राबाद मधे खरी शिवशाही ..जागेवर फैसला..

Gepostet von Pravin Vitthal Tarde am Donnerstag, 5. Dezember 2019

WhatsAppShare