हे सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे – निवृत्त न्यायमूर्ती ठिपसे

64

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – हे सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा धक्कादायक आरोप उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी केली आहे. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जाहीर टीका केली आहे.

सोशल मीडियाचा वापर करुन बुद्धीभेद केला जात आहे. देशातील जातीयवादाला उन्माद चढला आहे, असेही ते यावेळी म्हणाले. राज्यघटना अडचण वाटू लागली आहे. ती बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, ठिपसे यांनी निवृत्तीनंतर राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जातीयवादी शक्तींचा विरोध करण्यासाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे त्यांनी सांगितले.