…हे लज्जास्पद आहे – आदित्य ठाकरे

78

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – राज्य सरकार विरोधात भाजपाने आंदोलनाचे रान पेटवल्याने
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता शिवसेनेचे युवानेते आदित्या ठाकरे यांनीही त्यात उडी घेतली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यात आणि उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत महाराष्ट्र भाजपानं आंदोलनाची हाक दिली. भाजपाचं आंदोलन राज्यात सुरू असून, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी फोटो ट्विट करून हे लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.

करोना साथरोग नियंत्रणात राज्य सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपानं माझं अंगण रणांगण आंदोलन सुरू केलं. राज्यभरात आंदोलन होत असून, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरासमोर येऊन निर्दशनं करत आहेत. या आंदोलनातील एक फोटो पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे.

“हे अगदीच लज्जास्पद आहे. सत्तेच्या लालसेपोटी नेते काय करू शकतात. लहान मुलांना तळपत्या उन्हात उभं करण्यात केलं आहे. त्यांच्या तोंडावरील मास्क पूर्णपणे खाली सरकले आहेत. आज या मुलांना सुरक्षित आणि घरातच ठेवण्याची गरज असताना राजकीय आंदोलन करताना त्यांचे चेहरेही व्यवस्थित झाकलेले नाहीत. करोनाला विसरून गेले. कारण राजकारण प्रिय आहे,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

WhatsAppShare