…हे म्हणजे म्हशीपेक्षा  रेडकू  मोठे – अजित पवार

929

पुणे, दि. १७ (पीसीबी) – राज्य सहकारी बँकेत साडेअकरा हजार कोटींच्या ठेवी असताना पंचवीस हजार कोटींचा घोटाळा होईलच कसा ? हे म्हणजे म्हशीला रेडकू झाले आणि जन्मताच ते म्हशी पेक्षा मोठे झाले, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सहकारी बँक गैरव्यहारप्रकरणी भाष्य केले.

शिरुर- हवेली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारात ते बोलत होते.

पवार म्हणाले की, आम्ही कधी सत्तेचा माज आणि मस्ती केली नाही. विधानसभेत  आघाडीचे सरकार आले, तर तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले.   शिवसेनेने  शेतकऱ्यांना एकीकडे कर्जमुक्ती केली, तर भाजपने कर्जमाफी दिल्याचा बागुलबुवा केला आहे.

पण आज शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे, हे दिसत आहे. शेतकऱ्यांना बारा तास वीज देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. आता तरूणांना एक कोटी नोकऱ्या देवू सांगतात, मग मागील पाच वर्षात भाजपने केले काय ? असा प्रश्न पवार यांनी  केला.