‘हे’ चार महत्त्वाचे निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले; जाणून घ्या सविस्तर…

185

मुंबई,दि.६(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

1. केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत.

2. कोविडच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा.

3. शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय.

4. कोरोना विषाणुबाबत उपाययोजनांची माहिती.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांनी बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यां व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण’ मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

WhatsAppShare