हॅशटॅग मानसिकतेच्या लोकांनी टुकडे, तुकडे असा शब्द प्रयोग केला – कन्हैय्या कुमार

101

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – भारत तेरे टुकडे होंगे, असे शब्द आम्ही कधीही वापरले नाहीत. हॅशटॅग मानसिकतेच्या लोकांनी टुकडे, तुकडे असा शब्द प्रयोग केला आहे, असा खुलासा कन्हैय्या कुमारने आज (बुधवारी) मुंबईत केला . जेएनयूमध्ये भारत तेरे टुकडे होंगे ही घोषणा दिल्याच्या आरोपावर  कन्हैय्या कुमारने उत्तर  दिले आहे.

विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी त्यांने पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढवला.