हुंडा कमी दिलाय, मग 20 लाखांचा फ्लॅट घेऊन द्या; अशी मागणी करत विवाहितेचा छळ

107

चिंचवड, दि.14 (पीसीबी) : लग्नामध्ये हुंडा कमी दिला असल्याने देहूरोड येथे 20 लाख रुपयांचा फ्लॅट घेऊन द्या, अशी मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना जुलै 2019 ते डिसेंबर 2019 या कालावधीत घडली. याबाबत 13 जून 2021 रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश अरविंद उत्तरकर (वय 32), शर्मिला अरविंद उत्तरकर (वय 55, दोघे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता सासरी नांदत असताना त्यांच्या आई वडिलांनी लग्नामध्ये कमी हुंडा दिला असल्याने देहूरोड येथे 20 लाख रुपयांचा फ्लॅट घेऊन द्या अशी मागणी आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांकडे केली. ती मागणी पूर्ण होत नसल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारण्याची तसेच पतीने दुसरे लग्न करण्याची धमकी देऊन शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare