‘ही’ लस कोरोना व्हायरसपासून दोन वर्षांपर्यंत सुरक्षा देऊ शकते; वैज्ञानिकांचा दावा

24
Syringe being filled.

विदेश,दि.१४(पीसीबी) – रशियन वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, स्पुटनिक-व्ही ही लस कोरोना व्हायरसपासून दोन वर्षांपर्यंत सुरक्षा देऊ शकते. रशियाने ऑगस्टमध्ये आपली लस स्पुटनिक व्ही लॉन्च केली होती. आतापर्यंत कोणतीही कोरोनाची लस व्हायरसच्या संक्रमणापासून कितपत सुरक्षा देईल याबाबत दावा करण्यात आला नव्हता.

गमलेया रिसर्च इंस्टीट्यूटचे डायरेक्टर अलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांनी दावा केला होता की, स्पुटनिक-व्ही या लसीच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून दोन वर्षांपर्यंत सुरक्षा प्रधान करता येऊ शकते. टीएएसएस वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, युट्यूबवरील व्हिडीओत सोव्हिएत वाहिनीवर अलेक्झांडर गिंट्सबर्ग म्हणाले, “सध्या मी फक्त सुचवू शकतो, कारण अधिक प्रयोगात्मक डेटा आवश्यक आहे. आमची लस इबोला लसीच्या आधारावर तयार केली गेली आहे.

दरम्यान आतापर्यंत या लसीशी संबंधित सर्व प्रयोगांच्या आकडेवारीवरून असे सूचित होते की ही लस दोन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ संरक्षण प्रदान करू शकते. अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांच्या मते, ‘स्पुतनिक-व्ही’ ९६ टक्के केसेसमध्ये प्रभावी आहे. अंतरिम संशोधनाच्या परिणांमानुसार स्पुटनिक व्ही लस ४२ दिवसांनंतर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी दिसून आली.

WhatsAppShare